‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव 2024’ या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील शेतकरी व युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘मध केंद्र योजना’ राबविण्यात येत आहे. याचबरोबर उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. यासाठी 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, सभागृह येथे देशातील पहिल्या मध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक, शेतकरी व तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाचे सभापती साठे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत सोमवार दि. 15 आणि मंगळवार दि. 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 16 जानेवारी, 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Prime Minister Narendra Modi seeks blessings of Lord Sri Rama at historic Kalaram Temple

Sat Jan 13 , 2024
– Siyavar Ramachandra ki Jai slogans rent the air at the Kalaram temple premises Nashik :- Prime Minister Narendra Modi visited the historic Shri. Kalaram Temple here today and sought blessings from Lord Shri Rama. Prime Minister Narendra Modi also performed the ritual puja and aarti at the Kalaram temple. The temple management felicitated the Prime Minister on the occasion […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!