रमानगर रहिवासी विवाहित तरुणीचा खून..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रहिवासी 26 वर्षीय विवाहित तरुणीचा कामठी तालुक्यातील पावंनगाव येथील भाजप पदाधिकारी व ग्रा प सदस्य किरण राऊत यांच्या शेतात मृतदेह आढळल्याची घटना 28 नोव्हेंबर ला निदर्शनास आली असून या मृतदेह प्रकरणातील गूढ रहस्य उलगडण्यात कळमना पोलिसांना यशप्राप्त झाले असून सदर महिलेचा गळा आवरून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून मृतक महिलेचे नाव रजनी राधेश्याम पेंदाम वय 26 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिलेचा मागील आठ वर्षांपूर्वी नागपूर च्या इंदोरा रहिवासी राधेश्याम पेंदाम यांच्याशी विवाह झाला होता.यातून त्यांना दोन मुले व 1 मुलगी असे अपत्य जन्मास आले.या वैवाहिक कुटुंबात चारित्र्य संशयातुन नेहमी होत असलेल्या कौटुंबिक कलहाला कंटाळून सदर मृतक महिलेने मागील तीन वर्षांपूर्वी पतिशी घटस्फोट घेऊन माहेरी वास्तव्यास होती तर माहेर असलेल्या कामठी येथील रमानगरमध्ये वास्तव्यास असलेली आई ललिता सळमाके यांच्याकडे आपली 7 वर्षीय मुलीसह राहत नागपूर कळमना रहिवासी घनश्याम उईके यांच्याशी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती मात्र यांच्यातही चारित्र्य संशयाचा वाद नेहमीच होत असे त्यानुसार शुक्रवारला घनश्याम उईके सोबत घरी झालेल्या आपसातील वाद हा विकोपाला गेला त्यात घनश्याम उईके यांनी रजनी चा गळा आवरून जीवानिशी ठार केले.व पुरावा नष्ट करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याहेत मृतदेह रात्री 11 दरम्यान दुचाकीने पावंनगावच्या शेतात फेकून दिले.

पावंनगावच्या शेतात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कळमना पोलिसातर्फे शोध पत्रिका प्रकाशित करून ओळख पटल्यास कळमना पोलीस स्टेशन ला संपर्क साधण्याचे सांगण्यात आले त्यानुसार ही शोधपत्रिका हवेसारखी सोशल मिडियावरही व्हायरल झाली असता या मृतक महिलेच्या सात वर्षीय बालिकेने सदर महिलेची ओळख पटवून आजीला माहिती दिली यावर आजीने एकच दुःखाचा हंबरडा फोडत मृतकेची आई ललिता सळमाके,सात वर्षोय बालिका व घनश्याम उईके यांनीब पोलिस स्टेशन शोधत एच बी टाऊन जवळ पायी पायी आले असता एका वाहतूक पोलिसांना कळमना पोलीस स्टेशनचा पत्ता विचारला दरम्यान एपीआय देवाजी नरोटे यांनी या तिघांनाही पोलीस स्टेशन ला सोबत घेवुन जात मृतकेची ओळख पटल्याची खात्री पटवली व झालेंल्या कसोशीच्या चौकशीतून मर्ग चा गुन्हा हा खुनात रूपांतर करून आरोपी घनश्याम उईके रा कळमना विरुद्ध भादवी कलम 302 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Wed Nov 30 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.29) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 85 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, धंतोली आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com