‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या विषयावर मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवारी 2 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाचे महत्व, मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ वॉर्डमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, अभियानात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांचा सहभाग या विषयी सविस्तर माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com