‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची मुलाखत

मुंबई :- ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या तयारीविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची मुलाखत घेण्यात आली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सोमवार ६ मे रोजी ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक आणि यू ट्युब या समाज माध्यमाद्वारे पाहता येणार आहे. धाराशिवचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीमध्ये जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी, निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असलेली काळजी, मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम, यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नव मतदारांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आवाहन केले आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान पोलीस ठाणे जप्त असलेले 25 वाहने आगीत जळुन खाक

Mon May 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कोणीही नसल्याने जिवहानी टळली, आगीचे नेमके कारण गुलदस्यात.  कन्हान : – जुन्या पोलीस स्टेशन ला लागुनच जप्त असलेल्या वाहना ला रविवार (दि.५) मे अचानक आग लागली. या घटनेत एकुण २५ दुचाकी वाहने आगीत जळाले. कोणीही नसल्याने सुदैवाने कुणालाचा ईजा व जिवहानी झाली नाही. परंतु या आगीच्या घटनेमुळे अनेक उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. सुत्रान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com