तांदळाचा अनधिकृत साठा सापडल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य शिरीष चौधरी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसाताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवलेला 6 लाख 70 हजार 150 रुपये किमतीच्या 729 गोण्या रेशनचा तांदूळ महसूल आणि पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी 16 डिसेंबर रोजी दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आणखी काही लिंक आहे का हे तपासून घेण्यात येत आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलिस ठाण्यात 20 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कॅप्टीव्ह प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल - बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे

Wed Mar 15 , 2023
मुंबई : गडचिरोली येथील सुरजागड येथील गडचिरोली मेटल अँड मिनरल्स कंपनीच्या कॅप्टीव्ह प्लांन्टची प्रत्यक्ष पाहणी संबंधित विधानसभा सदस्य यांच्यासह करण्यात येईल असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य सुनिल केदार, सुभाष धोटे यांनी कॅप्टीव्ह प्लान्टचा दर्जा बदलल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री दादा भुसे म्हणाले की, सदर कंपनीच्या नावाने वाटप करण्यात आलेल्या कॅप्टीव्ह प्लान्टचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com