12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुचना

गडचिरोली :- दिनांक 29 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 रोजी शासकीय सुट्टीच्या दिवसी कार्यालय सुरु ठेवण्यात आलेले असून सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यानी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताऐवज सोबत दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे दाखल करावे. या दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा (प्रस्तावांचा) विचार केला जाणार नाही. यानंतर कोणतीही मुदत वाढ देण्यात येणार नाही, तसेच प्रस्ताव सादर न केल्यास व अर्जदाराचे व्यावसायीक पाठयाक्रमात प्रवेश न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची व महाविद्यालयाचे प्राचार्यांची असेल.

तसेच या आधी समितीस दिनांक 05 मार्च 2024 पर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यात आलेले आहेत (त्रृटीचे प्रकरणे वगळून). परंतु ज्यांना आजपावेतो जात वैधता प्रमाणपत्र प्राप्‍त झालेले नाही, अश्या सर्व अर्जदारांचे प्रकरण त्रृटीत असल्याने अर्जदारानी दर मंगळवारला मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायीक पाठयक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव स्विकारणे चालू असून कार्यालयामध्ये सादर करावे. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लकडगंज झोन मध्ये बकाया मालमत्ता कराचे वसुली करीता स्थावर मालमत्ता जप्तीची मोहिम

Fri Mar 29 , 2024
नागपूर :- महानगरपालिका लकडगंज झोन क्र. ०८ अंतर्गत स्थावर मालमत्ता बकाया कराचे वसुली करीता जप्तीची धडक मोहिम राबविण्यात येत असून आज दि. २८.०३.२०२४ रोजी खालील नमुद मौजा कळमना येथील नवजिवन भुमी विकास संस्थेचे भुखंड क्रमांक ६४ ते १७८ मधील भुखंड क्रमांक ७२, ८६, १०६, ११२. ११८ वगळुन उर्वरीत एकुण १०९ खुले भुखंड बकाया मालमत्ता कर रक्कम रूपये २०,३६,२५९/- चे वसुली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com