लकडगंज झोन मध्ये बकाया मालमत्ता कराचे वसुली करीता स्थावर मालमत्ता जप्तीची मोहिम

नागपूर :- महानगरपालिका लकडगंज झोन क्र. ०८ अंतर्गत स्थावर मालमत्ता बकाया कराचे वसुली करीता जप्तीची धडक मोहिम राबविण्यात येत असून आज दि. २८.०३.२०२४ रोजी खालील नमुद मौजा कळमना येथील नवजिवन भुमी विकास संस्थेचे भुखंड क्रमांक ६४ ते १७८ मधील भुखंड क्रमांक ७२, ८६, १०६, ११२. ११८ वगळुन उर्वरीत एकुण १०९ खुले भुखंड बकाया मालमत्ता कर रक्कम रूपये २०,३६,२५९/- चे वसुली करीता वारंट कार्यवाही करून जप्त करण्यात आले आहेत.

करीता संबंधित मालमत्ता धारकांना सुचित करण्यात येते की, नागपूर महानगरपालिकेतर्फे कर वसुली अभय योजना दि. ३१.०३.२०२४ पर्यंत राबविण्यात येत आहे, त्या अनुषंगाने वरीलप्रमाणे नमूद मालमत्तेचा थकीत कराचा भरणा दि. ३१.०३.२०२४ चे आत करावा अन्यथा सदर मालमत्तेचे लिलाव करून बकाया कर वसूल करण्यात येईल तसेच झोन मधील इतरही मालमत्ता धारकांना आवाहान करण्यात येते की, त्यांनी बकाया मालमत्ता कर दि. ३१.०३.२०२४ चे आत भरून जप्ती कार्यवाही टाळावी. कर वसुली करीता म.न.पा. कार्यालय दि. ३१.०३.२०२४ पर्यंत सुटीचे दिवशी तसेच शनिवार व रविवार रोजी सुध्दा चालु आहेत, करीता नागरीकांनी हयाचा लाभ घ्यावा.

सर्दहु कार्यवाही अती. आयुक्त आचल गोयल याच्या निर्देशानुसार झोनचे सहा. आयुक्त गणेश राठोड, यांच्या मार्गदार्शनात सहा. अधिक्षक रोशन अहिरे, कर निरीक्षक भुषण मोटघरे, मनिष तायवाडे, संतोष समुन्द्रे, अमित पाटिल, लालप्पा खान, आशिष ठाकरे, राज साम्रतवार हयांचेद्वारे करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ताजधाम पागलखाना येथील सालाना उर्स निमित्त वाकी दरबार कडून आज शाही संदल निघणार

Fri Mar 29 , 2024
नागपूर :- येथील ताजधाम पागलखाना शरीफ येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या सालांना उर्स २९ मार्च पासून सुरू होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाकी दरबार ट्रस्ट कडून ताजधाम पागलखाना नागपूर येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या सालाना उर्स निमित्त २९ मार्च ला शाही संदल काढण्यात येत आहे २९ मार्च ला सकाळी १०.०० वाजता वाकी दरबार येथून शाही संदल निघून ताजधाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com