ट्रक दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 13 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना मार्गावरील लाईफ लाईन हॉस्पिटल जवळ कामठी कडे सरळ मार्गाने जाणाऱ्या ट्रक दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 5 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव विकास गोविंद पवार वय 21वर्षे रा बँक ऑफ इंडिया जवळ,202,वैभवी अपार्टमेंट ,हूडकेश्वर रोड, राजापेठ नागपूर असे आहे.

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक क्र एम एच 40 वाय 686 चा चालक आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने कामठी कळमना मार्गे कामठी कडे वाहून नेत असता सरळ मार्गाने येणाऱ्या दुचाकी क्र एम एच 49 ए एम 1488 च्या चालकाला कट दिल्याने दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन ट्रकखाली आल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ झाल्याने झालेल्या अतिशय रक्तस्त्रावातून जागीच मरण पावला .घटना घडताच ट्रक चालकाने घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले .

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी पसार ट्रकचालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com