– अटल भू-जल अभियान
– भूजल सर्वेक्षण आयुक्त तथा संचालकां कडून पाहणी
– ग्राम पंचायत खुर्सापार येथील प्रकल्पाची पाहणी
कोंढाळी :- भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविणेकरीता केंद्र शासन व जागतिक बँक यांचे संयुक्त विद्यमाने भारतातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या सात राज्यात १०० टक्के केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या बाबतची अधिकृत घोषणा पंतप्रधानांनी.२५ डिसेंबर २०१९ रोजी केलेली आहे.
सदर योजना सात राज्यामध्ये राबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक यांचे द्वारे एकुण रु ६००० हजार कोटी आर्थीक तरतूद करण्यात येणार असून त्यामध्ये ३००० हजार कोटी केंद्र शासन व ३००० हजार कोटी जागतिक बँक याप्रमाणे ५०: ५० वाटा असणार आहे.
या करीता महाराष्ट्र राज्यास एकुण रु ९२५.७७ कोटीची तरतूद उपलब्ध आहे.
सदर योजना पुर्णत:केंद्र पुरस्कृत असुन राज्य शासनाचा प्रत्यक्ष वाटा निरंक आहे. मात्र मनुष्यबळ व प्रकल्प क्षेत्रातील गावांमध्ये अस्तित्वातील जलसंधारण व सूक्ष्म सिंचनाच्या योजनांची एककेंद्राभिमुखता याद्वारे राज्याचे योगदान असणार आहे.
योजनेचा कालावधी सन 2020-21 ते 2024-25 एवढा असुन १ एप्रील २०२० पासून अंमलबजावणी सुरु करावयाची आहे.
सदर योजना भूजल उपशाच्या दृष्टीने अति शोषीत,शोषीत, आणि अंशत शोषीत क्षेत्र असलेल्या क्षेत्रांमध्ये राबवायचा असून त्याकरीता राज्यातील अति शोषीत,शोषीत, आणि अंशत शोषीत पाणलोट क्षेत्रातील १३ जिल्ह्यातील ११३३ ग्राम पंचायती मधील १४४२ गावांची निवड केलेली आहे.
योजनेची उद्दीष्टे-
सदर प्रकल्पाची मुख्य उद्दीष्टे खालील प्रमाणे आहे.
मागणी (पाणी बचतीच्या उपाययोजना) व पुरवठा (जलसंधारण व भूजल पुनर्भरण) व्यवस्थापनाच्या सुत्राचा अवलंब करुन भूजलाच्या साठ्यात शाश्वतता आणणे.
या करीता सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनाच्या जसे की, मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादी माध्यमातुन होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्राभिमुखता साधणे.
भूजलाच्या शाश्वत विकासाकारीता राज्य, जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणेअसे आहे.
यात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याच्या खुर्सापार या ग्राम पंचायतीची निवड झाली आहे. या ग्रामपंचायती मार्फत माजी सरपंच सुधीर गोतमारे विद्यमान सरपंच मिना कातलाम, उपसरपंच विनायकराव साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अटल भू-जल अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अभियान चे पाहणीसाठी डॉ. भालचंद्र चव्हाण आयुक्त तथा प्रकल्प संचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ. प्रवीण कथने प्रकल्प समन्वयक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ.चंद्रकांत भोयर प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा
नागपूर विभाग नागपूर, यांनी खुर्सापार येथे भेट देऊन अटल भुजल योजना व ऐकरीसाईड च्या कामाची पाहणी केली व समोरील सूचना दिल्या यावेळी डॉ. वर्षा पी. माने वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर, खुर्सापार ग्राम पंचायत चे माजी सरपंच सुधीर गोतमारे, विद्यमान सरपंच मीना कातलाम उप सरपंच विनायकराव साठे. विलास कातलाम , युवा शेतकरी पप्पू गोतमारे, माणिकराव काळे, डॉ.शिवाजी पदमने वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा भंडारा, मा. डॉ.अभिजीत धाराशिवकर सहाय्यक भूवैज्ञानिक भु.स.वि.यं.नागपुर, नंदकिशोर बोरकर सहाय्यक भूवैज्ञानिक भू. स. वि.यं नागपूर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील (माहिती शिक्षण संवाद तज्ञ ), निलेश खंडारे ,( कृषी तज्ञ) प्रतीक हेडाऊ, सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा (DIP) समन्वयक ममता बालपांडे, कृषी तज्ञ गौतम मेश्राम, भूजल तज्ञ कुमारी विश्वधारीणी मुंगणकर, जलसंधारण तज्ञ मयूर दहिजोड, माहिती शिक्षण संवाद तज्ञ स्वप्नील बांगर समुदाय संघटक मनीष ढोके उपस्थित होते.