यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती दिनांक २८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानात बचतगटांच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या स्थळाची पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली.
यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळी उभारण्यात येत असलेला स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा, बैठक व्यवस्था, तात्पुरत्या स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली व आढावा घेतला. स्टेज, मंडप उभारणीसह सर्व कामे कालमर्यादेत होतील याबाब जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली.