चौकशी समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश एस.पी. मुळे यांची नियुक्ती स्टेशनरी घोटाळा चौकशी समितीचा निर्णय

नागपूर, ता. २७ : मनपाच्या विविध विभागात झालेली आर्थिक अनियमितता व कार्यपद्धतीतील भ्रष्ट आचरणाची चौकशी करण्यासाठी गठीत समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश एस.पी. मुळे यांची नियुक्ती करण्याचे निर्णय गुरुवारी (२७ जानेवारी) समितीद्वारे घेण्यात आला आहे.

          सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.पी. मुळे यांनी ग्राहक संरक्षण न्यायालयामध्ये काम केले आहे तसेच ते मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार सुद्धा होते. त्यांना अनेक चौकशी समितीमध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.

          मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात स्टेशनरी घोटाळ्यासंबंधी नियुक्त चौकशी समितीची बैठक पार पडली. यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, सदस्य विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ॲड. संजय बालपांडे, संदीप जाधव, सदस्या वैशाली नारनवरे, उपायुक्त निर्भय जैन, विधी अधिकारी सुरज पारोचे उपस्थित होते.

          मागील बैठकीत चौकशी समितीमार्फत पोलिस आयुक्तांना सर्व विभागांची चौकशी करण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचेही निर्णय घेण्यात आले होते.  परंतू पोलिस आयुक्तांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना टपाल मार्फत पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना समिती सदस्य प्रत्यक्ष भेटून निवेदन देतील, असे समितीचे अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सांगितले. विभागातर्फे समिती समोर ३ ऑडिटरच्या नावाचे प्रस्ताव ठेवण्यात आले. या तिघांशी समिती सदस्य संदीप जाधव चर्चा करून एकाला समितीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतील, असाही निर्णय समितीद्वारे घेण्यात आला.

          समिती प्रमुख अविनाश ठाकरे यांनी सामान्य प्रशासन विभागला कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. मुळ कागदपत्रे पोलिसांकडे असल्यास त्याची सत्यप्रत (फोटोकॉपी) समितीपुढे सादर करण्यात यावी, असेही निर्देश समितीचे प्रमुख सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोसिया ने किया डालमिया सीमेंट के ईडी हकीमुद्दीन अली का सत्कार

Thu Jan 27 , 2022
नागपुर – कोसिया विदर्भ चेयरमन सीए जुल्फेश शाह के नेतृत्व में कोसिया  प्रतिनिधिमंडल ने डालमिया सीमेंट {भारत} लिमिटेड के कार्यकारी निदेशक श्री हकीमुद्दीन अली को मुरली सीमेंट के अधिग्रहण से 15 महीने के रिकॉर्ड समय में चंद्रपुर जिले में सीमेंट प्लांट को चालू करने के लिए बधाई देते हुए सत्कार किया.आईबीसी प्रक्रिया में इसे अधिग्रहण करने के पश्चात डालमिया सीमेंट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!