पट्टाभि श्रीराम मंदीर संस्थानच्यावतीने श्रीराम नवमी महोत्सवाचे आयोजन

अमरावती :- शहरातील पट्टाभि श्रीराम मंदीर संस्थान कुंभारवाडाच्यावतीने 22 ते 31 मार्च दरम्यान श्रीराम नवमी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात दररोज भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम, उद्या 28 मार्च रोजी श्री मुरलीधर महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम 29 मार्च रोजी राधाकृष्ण महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजता अनिल गुल्हाने यांचा श्रीराम कथा, दुपारी 4 ते 6 पद्मावती महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, 31 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सत्यनारायण पूजा, दुपारी 4 ते 6 पर्यंत भक्तमंदीर महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व गोपालकाला होईल.

30 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. अनिल बोंडे, नवनीत राणा, आमदार अॅड. यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, रवि राणा, माजी महापौर विलास इंगोले, माजी नगरसेविका सुनिता भेले, खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन तामटे यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पट्टाभि श्रीराम मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. विलास नांदुरकर, सचिव राजेश हरमकर, सहसचिव गोपाल कळसकर, कोषाध्यक्ष विवेक अंबुलकर, सदस्य सर्वश्री हरिसिंग ठाकूर, संजय खारकर, महेश नांदुरकर, लक्ष्मण शिरभाते, सुरेश पाखरे, मिना गुल्हाने, राम भजन मंडळाच्या संगिता तिप्पट, पारवे, शिला तायडे, मेहरे, अनुराधा अटाळकर, विजयकर, वाडकर, जिरापुरे, सुलभा ठाकूर, बेबी करुले, मंदा तायडे, मेघा अंबुलकर, कांता कळसकर, वैशाली नांदुरकर यांनी केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com