संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील काही दिवसात चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी सावधानतेचा ईशारा घेतला आहे त्यानुसार आज सायंकाळी साडे पाच दरम्यान एक तरुण फुटाना ओली चौकातिल एका उभ्या दुचाकीजवळ उभा राहून दुचाकीची छेड घेत असताना उपस्थित नागरीकानी गाडी चोरी करीत असल्याची समजूत घालून सदर तरुणास नागरिकांच्या जमावाने सामूहिक मारझोड करून जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या स्वाधीन केले मात्र स्वाधीन करताच अवघ्या काही वेळातच सदर तरुणाचा पोलीस स्टेशन मध्येच मृत्यु झाल्याची घटना घडली असून मृतक तरुणाचे नाव मो नासिर उर्फ गब्बर मो रमजान अन्सारी वय 40 वर्षे असे आहे.या घटनेने वारीसपुरा तसेच फुटाना ओली परिसरात एकच खळबळ माजली असून ही घटना चोर समजून संन्याशाला फाशी अश्या आश्यातून घडली त्यामुळे या घटनेत सदर निर्दोष मृतकाच्या घटनेला जवाबदार कोण ठरणार?हा चर्चेचा विषय आहे तर मृतकाच्या नातेवाईकाना न्याय मिळेल का?अशाही चर्चेला उधाण आहे.
पोलिसांनी पुढील उत्तरीय तपासणीसाठी सदर मृतदेह त्वरित शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून घटनेचे वास्तविकता शोधण्यात येत आहे बातमी लिहिस्तोवर कुणावरही गुन्हा दाखल केला नव्हता.मृतकाच्या पाठीमागे आई,वडील,पत्नी,3 मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.