भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन

मुंबई :- चांद्रयान-3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

4 हजार 277 खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई ; 1 कोटी 83 लक्ष रूपयांची वसूली

Fri Jul 14 , 2023
मुंबई :- राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत 14 हजार 161 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 हजार 277 खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत 1 कोटी 83 लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे. तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com