कामगार नगर च्या सौरभ रंगारी ची भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नेपाळ टेनिस बॉल क्रिकेट महासंघाच्या विद्यमाने तसेच ऐशीयन टेनिस बॉल क्रिकेट महासंघाच्या मार्गदर्शनार्थ नेपाळ येथील पोखरा मध्ये 30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 पर्यंत एशिया कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा(पुरुष-महिला) चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत भारत, भूतान, श्रीलंका, बांगलादेश,व नेपाळ चे महिला पुरुष संघ सहभाग घेत असून नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील कामगार नगर वस्तीतील रहिवासी सौरभ मनोज रंगारीचा भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात हिमाचल प्रदेश च्या सुंदरनगर येथे ऑल इंडिया इंटर झोनल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विदर्भातील महिला-पुरुष संघाला तिसरा स्थान प्राप्त झाला होता.या स्पर्धेत कामठी च्या सौरभ रंगारी ने खेळातील उत्तम प्रदर्शन केले होते यातून मिळलेल्या यशाचे कौतुक करीत सौरभ रंगारीचा 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 पर्यंत नेपाळ येथे आयोजित भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत निवड करण्यात आली.

सौरभ रंगारी ने आपल्या या निवडीचे श्रेय मुख्यता आई सुरेखा रंगारी,वडील मनोज रंगारी,आजोबा सुर्यभान पाटील, आजी विमल पाटील तसेच टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता चे महासचिव इमरान अहमद लारी,अध्यक्ष अजय हिवरकर, चेअरमेन शम्मी करोसिया,विदर्भटेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चे सचिव राजकुमार कैथवास,अध्यक्ष आशिष मंडपे तसेच नागपूर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ला दिले.

कामठी शहरातील एका कामगार नगर सारख्या नझुल वस्तीत वास्तव्य करणाऱ्या सौरभ रंगारी यांची क्रिकेट खेळात गुणात्मक कौतुक करीत भारतीय संघात निवड झाल्याबद्दल संदीप महतो,अभिजित झा,महेश्वरी चौधरी, श्रेयश रंगारी,राजेश कैथवास ,निशा दहेरिया, शिवम बरसे, यश गजे, शिवम द्विवेदी, रुपेश पाटील, अखिलेश वाल्मिकी तसेच प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी चे संयोजक राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे, विकास रंगारी, गीतेश सुखदेवें,कोमल लेंढारे,उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर ,मंगेश खांडेकर, सुमित गेडाम ,रायभान गजभिये आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार चंद्रशेखर बावनकुळे कामठी शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याने विकासपुरुष म्हणून ओळख - भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट

Sat Dec 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सन 2004 पासून कामठी शहराचा आमदार म्हणून लोकप्रितिनिधीची भूमिका साकारत असताना कामठी शहरात कौमी एकतेचे वातावरण कायम ठेवत कामठी शहराच्या विकासासाठी कोटीपेक्षाही अधिक शासकीय निधीं देऊन शहरात विकासाची गंगा खेचून आणली आणि कामठी शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याने विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची विकासपुरुष म्हणून ओळख आहे.मात्र या विकासपुरुषाकडे कौतुकास्पद न बघता इर्षेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com