सरस्वती नगर बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने सरस्वती नगर नागपूर 34 द्वारा नवरात्र उत्सव

नवरात्र दुर्गा /शारदा माता उत्सव सोहळा तसेच रास गरबा स्पर्धा 2022

नागपूर :- दक्षिण नागपूर येथील बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने सरस्वती नगरात कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी 26 सप्टेंबरला होणार आहे दुपारी साडेबारा वाजता घटस्थापना  आमदार मोहन मते, सुधाकर कोहळे, माधुरी प्रवीण ठाकरे, उमा शंकर पर्वते यांच्या उपस्थितीत होणार आहे. नंतर सायंकाळी ७ वाजता आरती केली जाईल. मंगळवार २७ सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता शक्ती महिला भजन मंडळ सरस्वती नगर व सायंकाळी ७:३० वाजता लहान मुला मुलींचे रेकॉर्डिंग डान्स.

बुधवारी २८ सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता नरेंद्र महाराज भजन मंडळ सरस्वती नगर सायंकाळी ४ वा. देवीचा गोंधळ सायंकाळी ७:३० वाजता. रास गरबा स्पर्धा शुभारंभ पहिली फेरी घेण्यात येईल. गुरुवारी २९ सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता. श्रीराम भजन मंडळ सरस्वती नगर आणि सायंकाळी ७:३० वाजता. रास गरबा स्पर्धेची दुसरी फेरी घेण्यात येईल. शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता शाही गजानन भजन मंडळ विठ्ठल नगर त्यानंतर संध्याकाळी ७:३० वाजता रास गरबा स्पर्धेची तिसरी फेरी घेण्यात येईल. शनिवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी दोन वाजता जिल्हारे भजन मंडळ आणि ७:३० वाजता ज्वाला जागरण ग्रुप पोलीस लाईन टाकळी रोड नागपूर येथील देवीचे जागरणया कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार 2 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता. श्री गणेश महिला भजन मंडळ आणि ७:३० वाजता रास गरबा स्पर्धा सेमी फायनल फुल कॉस्ट्युमसोमवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होम हवन दुपारी 12 वाजता रांगोळी स्पर्धा सायंकाळी ७ वाजता आरती ७:३०० वाजता रास गरबा स्पर्धा मेगा फायनल थीम – रात्री १० वाजता पारितोषिक वितरण केल्या जाईल. यामध्ये प्रथम बक्षीस 15 हजार रुपये द्वितीय बक्षीस 7 हजार रुपये आणि तृतीय बक्षीस 5 हजार रुपये ठेवलेले आहेत. मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता हरी ओम भजन मंडळ जानकी नगर आणि सायंकाळी ७ वाजता आरती नंतर ७:३० वाजता भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम व रात्री ११ वा. घट विसर्जन केल्या जाईल. आयोजित केलेला आहे. कृपया सर्व वस्तीतील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सरते शेवटी बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता रावण दहनाचे आयोजन केले आहे. असे युवा मंडळांनी आवाहन केले आहे. आणि सर्व वस्तीतील नागरिकांनी, सल्लागार समितीने आणि संचालक मंडळांनी, अथक परिश्रम घेत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com