समाजकार्य महाविद्यालय कामठी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- समाजकार्य महाविद्यालय,कामठी येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. समाजकार्य महाविद्यालय कामठीचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले. माजी राज्यमंत्री व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वतःचे असामान्यत्व सिद्ध करणारा कामठी शहरातील होतकरू व हुशार विद्यार्थी निखिल जामगडे यांनी स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर ऑस्ट्रेलिया येथील नामवंत युनिव्हर्सिटीत एम. एस. साठी प्रवेश मिळविल्याबद्दल ॲड. सुलेखा कुंभारे व  डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येऊन ध्वजारोहणाचा सन्मानही देण्यात आला. या सोहळ्याला प्राचार्य डॉ.रुबीना अन्सारी, प्रा सागर भावे तसेच कामठी शहरातील अनेक मान्यवर नेते प्रमुख उपस्थिती म्हणून लागले होते. यावेळी ॲड. सुलेखा कुंभारे, डॉ. पुरणचंद्र मेश्राम, निखिल जामगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ध्वजसंचलन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. सविता चिवंडे यांनी मानले.

कार्यक्रमाला डॉ. प्रणाली पाटील, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ.मनोज होले, डॉ. निशांत माटे, प्रा. शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे,डॉ. हर्षल गजभिये, प्रा.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख, शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल बागडे, सुभाष तिघरे, उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, प्रतीक कोकोडे,किरण गजभिये, वसंता तांबडे,शशील बोरकर, नीरज वालदे, राहुल पाटील  तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर मनपा मुख्यालयात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

Wed Aug 16 , 2023
चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवात साजरा होणारा असल्याचे महत्व लक्षात घेत चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालय येथे १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वा वर्धापनदिनी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता महेश बारई,मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com