खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील विभागीय कार्यालयाचे शनिवारी गुरुवार 21 डिसेंबर 2024 रोजी आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मानाचे दादोजी कोंडदेव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, छत्रपती पुरस्कार असे चारही पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी क्रीडा सहसंचालक जयप्रकाश दुबळे, माजी नगरसेवक संजय बंगाले, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.

नागपूर शहरासह विदर्भातील खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाला लवकरच सुरूवात होणार आहे. खेळाडूंना नोंदणी तसेच अन्य महत्वाची माहिती मिळविण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाची मोठी मदत होते. या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित आमदार प्रवीण दटके यांनी खासदार क्रीडा महोत्सव हा खेळातून ध्येयाकडे प्रेरीत करणारा महोत्सव असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे खेळाकडून ध्येयाकडे वाटचाल आणि त्यातून हिंदवी स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वास नेली. तोच आदर्श पुढे नेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आयोजित करून तरुणांना ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रेरित केल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकामध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांनी महोत्सवाच्या वाटचालीची माहिती दिली. 2018 चा पहिला खासदार क्रीडा महोत्सव 20 दिवसांचा होता. यात 30 क्रीडांगणांवर 20 खेळ, 292 स्पर्धा, 540 चमू, 880 प्रशिक्षक, 1500 ऑफिशियल्स आणि 25 हजार खेळाडूंचा समावेश होता. या क्रीडा महोत्सवात 43 लक्ष 80 हजार 200 रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. तर मागील वर्षी 2022 साली झालेल्या पाचव्या खासदार महोत्सवात 15 दिवसांत 49 क्रीडांगणांवर 35 खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात 2280 चमूंनी सहभाग घेतला. 5000 ऑफिशियल्स आणि 54 हजार खेळाडूंचा सहभाग होता. महोत्सवात 1 कोटी 30 लक्ष 87 हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मागील पाच वर्षांचा महोत्सवाच्या प्रवासाचा आढावा घेता महोत्सवाला प्राप्त होत असलेले भव्य स्वरूप आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात पुढे अधिक भव्यदिव्य होईल, असा विश्वास डॉ. पीयूष आंबुलकर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन महोत्सवाचे सदस्य नीरज दोंतुलवार व आभार डॉ. अशफाक शेख यांनी मानले.

यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे कोषाध्यक्ष आशिष मुकीम, सदस्य नागेश सहारे, डॉ. संभाजी भोसले, नवनीत सिंग तुली, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर इ. उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

Sun Dec 22 , 2024
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्यता नोंदणी अभियानाला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रारंभ झाला. या वेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!