नागपूर :- महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि राष्ट्रीय पॉवरलिफ्टर्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य सब-ज्युनियर, ज्युनियर, सिनियर व प्रौढांची पॉवरलिफ्टिंग, बेंचप्रेस, डेडलिफ्ट चॅम्पियनशिप आजपासून मोमिनपुरा येथील अन्सार कम्युनिटी हॉलमध्ये आरंभ झाली.
स्पर्धेचे उदघाटन रिझवान अन्सारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जावेद अख्तर, वकार अन्सारी, राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील अग्रवाल, अन्वर बेग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील १५ जिल्ह्यांतील एकूण तिनशे पॉवरलिफ्टर्स सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आगामी जानेवारीमध्ये विशाखापट्टणम येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.