नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रोप स्किपिंग स्पर्धेचे शनिवारी महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. झिरो मॉईल मेट्रो स्टेशन येथे १२ वर्षाखालील व त्यावरील मिश्र गटात ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार गिरीश व्यास, महा मेटा्रेचे अनिल कोकाटे, माजी नगरसेवक संजय बंगाले, सुनील हिरणवार, माजी नगरसेविका उज्ज्वला शर्मा, स्पर्धेचे कन्व्हेनर सुनील मानेकर, क्रिष्णा पांडे, अनिकेत रामटेके, आशिष देशपांडे, सवित वालदे आदी उपस्थित होते.
जिम्नॅस्टिक स्पर्धेला सुरूवात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जिम्नॅस्टिक स्पर्धेला शनिवारी (ता. १४) सुरूवात झाली. काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. जिम्नॅस्टिक स्पर्धेला खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी भेट दिली व खेळाडूंना प्रोत्साहित केले. याप्रसंगी स्पर्धेचे कन्व्हेनर लक्ष्मीकांत किरपाने, समन्वयक राकेश भोयर, संकेत विंचुरकर, मयुरेश सिरसीकर, पंकज कुंडे, पुरूषोत्तम दारवनकर आदी उपस्थित होते.
ज्यूडो स्पर्धेचे उद्घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ज्यूडो स्पर्धेचे शनिवारी (ता. १४) आमदार मोहन मते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सक्करदरा येथील जैन कलार समाज भवन येथे या स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, अभय गोटेकर, माजी नगरसेविका उषा पॅलेट, मंगला खेकरे, दिव्या धुरडे, भारती बुंडे, स्पर्धेचे कन्व्हेनर डॉ. सौरभ मोहोड, केतन ठाकरे, डॉ. पुरूषोत्तम चौधरी, मुकुंद डांगे आदी उपस्थित होते.
तलवारबाजी स्पर्धेला सुरूवात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तलवारबाजी स्पर्धेला दुर्गानगर स्कूल येथे शनिवारी (ता. १४) सुरूवात झाली. आमदार मोहन मते यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पर्धेचे समन्वयक परशू ठाकूर, स्पर्धेचे कन्व्हेनर लक्ष्मीकांत किरपाने, राहुल मांडवकर, अजय सोनटक्के, मोहम्मद सोयब, देवेन दस्तुरे, माजी नगरसेविका कल्पना कुंभलकर आदी उपस्थित होते.