नागपूर कराराची होळी २८ सप्टेंबरला, ३० सप्टेंबरला आष्टी शहीद येथून कौंडण्यपूर पर्यंत पदयात्रा

– २ ऑक्टोबरला कोंडण्यपूरात विराआंसचा विदर्भ संकल्प महिला मेळावा.

नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिळवु औंदा’ या कार्यक्रमाअंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०२३ स्वतंत्र विदर्भाचे मिळवण्याकरीता ‘करु किंवा मरु किंवा जेलमध्ये सडू’ अशी घोषणा केली असून या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून आंदोलन तीव्र करुन घटनेतील कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरीता भाग पाडुन स्वतंत्र विदर्भ राज्याची ११८ वर्षांची मागणी कायमस्वरूपी निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून दि. ०५/०९/२०२३ रोजी वर्धा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत २८ सप्टेंबर २०२३ रोजी विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक असणाऱ्या नागपूर कराराची होळी जिल्ह्या जिल्ह्यात करण्याचा निर्णय घेतला असून नागपूर शहरात व्हेरायटी चौकात होळी केली जाणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईचे प्रतिक असलेले आष्टी (शहीद) जिल्हा वर्धा येथुन विदर्भ निर्माण संकल्प पदयात्रा दि. ३०/०९/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता सुरु होणार असून ती आष्टी ते तळेगाव व तळेगाव येथे मुक्काम करणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता ती तळेगाव येथून निघून रस्त्यातील गावात विदर्भाचा जागर करीत रात्रौ आर्वी येथे मुक्कामी राहणार आहे. तिसरे दिवशी दि. ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता आर्विवरून निघून दुपारी १२ वाजता पदयात्रेचा समारोप कौंडण्यपुर येथे होणार आहे.

दि. ०२/१०/२०२३ ला दुपारी १ वाजता विदर्भ निर्माण संकल्प महिला मेळावा व महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतिक असलेल्या रुक्मिणीला साकडे घालून केंद्र सरकारला विदर्भ राज्य तत्काळ निर्माण करण्याची सद्बुद्धी दे अशी साद महिला मेळाव्यातून घालतील व “हमकोही इतनी शक्ती देना, जंग हम लढे” अशी घोषणा करतील व “भिवू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.” असे पुरुष सत्याग्रही भावांना आवर्जून सांगतील. विदर्भातील आया बहिणींनी व जनतेनी उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन विराआंस कार्यकारिणीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूरग्रस्त भागातील नागरिकांना मनपाच्या किटमुळे आधार, अनेक भागातील बाधितांना अन्नधान्याच्या किटचे वितरण

Wed Sep 27 , 2023
नागपूर :- पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे वितरीत करण्यात येत असलेली अन्नधान्याची किट मोठा आधार ठरत आहे. मनपाद्वारे मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर, धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी झोनमधील पूरग्रस्तांना 3370 किटचे वितरण करण्यात आले. उर्वरित पुरग्रस्तांना पुढेही रेशन किटचे वितरण सुरु राहिल.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार पूरग्रस्तांसाठी मनपाद्वारे हजार अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याच्या एकूण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com