जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक

अरोली :- अंतर्गत मौजा निमखेडा बाजारचौक येथे दिनांक २८/०८/२०२४ चे ०९/५० ते १०/४० वा. दरम्यान अरोली पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन अरोली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन पिकअप गाडी क्र. एम एच ४० वी एल ९०३१ क्रमांकाच्या गाडीला थांबवुन तपासले असता सदर वाहनात आरोपी नामे-१) रूपेश पंजाबराव येसकर वय ३४ वर्ष रा. नरसाळा तह. मौदा जि. नागपुर व कंडक्टर (२) संकेत भिमराव खोब्रागडे वय ३५ वर्ष रा. नरसाळा तह. मौदा जि. नागपुर आरोपीच्या ताब्यातुन १) एक लाल रंगाची गाय अंदाजे वय ६ वर्ष कि. १४,०००/- रू. २) एक लाल रंगाची गाय अंदाजे वय ६ वर्ष कि. १४,०००/- रू. ३) एक लाल रंगाची कालवड अंदाजे वय ४ वर्ष कि. ८०००/- रू. ४) एक लाल रंगांचा गोरा अंदाजे वय २ वर्ष कि. ७,०००/- रू. ५) एक लाल रंगांचा गोरा अदांजे वय १ वर्ष कि. ५,०००/- रू. असे एकुन ०५ लहान मोठे गाँवश एकुन कि.४८,०००/-रू, ची गोवश व पिकअप गाडी क्र. एम एच ४० बी एल ९०३१ कि. ५,००,०००/रू, असा एकुन ५,४८,०००/- रूपयाचा मुद्देमाल घेवुन जातांनी मिळून आले. सदर पिकअप वाहना मधील जनावरांना कोणत्याही चारापाण्याची व्यवस्था न करता कुर व निर्दयतेने वागणुक देत घेवुन जात असतांना मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातून वाहनासह असा एकुण किंमती अंदाजे ५,४८,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी नामे पोहवा संदिप ईश्वर बाजनघाटे पोस्टे अरोली यांचे रिपोर्टवरून पो. स्टे. अरोली येथे वरील आरोपीतांविरुध्द कलम ११ (१), (ड) प्रा.नि.वा. कायदा १९६० सहकलम ५ए (२), ९ महाराष्ट्र पशुसर्वधन कायदा, १९७६ सहकलम ३(५) भा. न्या. संहीता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे अरोली येथील ठाणेदार सपोनि स्नेहल राउत, पोउपनि सुशिल सोनवणे, पोहवा संदीप वाजनघाटे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

Thu Aug 29 , 2024
– पालघरमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन – वाढवण हे भारतातील सर्वात मोठ्या खोल सागरी बंदरांपैकी एक असेल – हे बंदर भारताची सागरी कनेक्टीव्हिटी वृद्धिंगत करेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान अधिक बळकट करेल – पंतप्रधान सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे देखील उद्घाटन आणि पायाभरणी करणार – नॅशनल रोल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com