संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना युनिट द्वारा दिनांक 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पर्वावर रेड रिबन क्लब चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विचारपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विनय चव्हाण, प्रमुख पाहुणे डॉ. नमिता चव्हाण, सिनियर मेडिकल ऑफिसर,उपजिल्हा रुग्णालय कामठी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे, लेडी ऑफिसर डॉ. निशिता अंबादे , कविता शंभरकर आणि रवी वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे यांनी केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे यांनी सर्व विद्यार्थांना अंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त युवकांच्या जबाबदाऱ्या समजाऊन सांगत रासेयो शपथ दिली. प्रमुख पाहुण्या डॉ. नमिता चव्हाण यांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना रेड रिबन क्लब चे महत्व समजावून सांगितले. आणि आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पर्वावर महाविद्यालयाने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शुभेच्छा सुद्धा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विनय चव्हाण यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून बोलताना म्हटले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपला व्यक्तिमत्व विकास चांगल्या पद्धतीने घडवावा आणि युवाशक्ती काय करू शकते ते समजावून सांगितले.सोबत युवकानी रक्तदानासारखे दान करावे याबद्दलही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. निशिता अंबादे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सुद्धा बऱ्याच संख्येने उपस्थित होते.