गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’चे लोकार्पण बुधवारी

– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाखविणार हिरवी झेंडी

नागपूर :- श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारा संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’चे उद्या बुधवारी 24 जुलै रोजी सकाळी 9 वाजता लोकार्पण होणार आहे. सिव्हिल लाईन्स येथील ‘रामगिरी’ येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ‘फिरता दवाखाना’ला हिरवी झेंडी दाखवतील.

विविध भागांमध्ये जाऊन गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’ची श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारे सुरुवात करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी महापौर, सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

21 युनिट चे बिल 16 हजार आणि या मस्तीचा महावितरण अधिकारी उचलतात पगार

Tue Jul 23 , 2024
– देवाने ज्यांचे आयुष्य टाकले अंधकार ते आजोबा म्हणतात प्रकाश व्हावा घरा घरात,वाढत्या वीजबिल विरोधात सामान्य नागरिकांची आवाज बनले बंटी शेळके नागपूर :- आज बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यकारी अभियंता, तुळशीबाग झोन, महाल नागपुर वर पैदल मोर्चा काढण्यात आला. कारण नागपुर शहरातील विविध भागात अव्वाच्या सव्वा वीजबिल येत आहे. ज्या नागरिकांना पहले 700,800 बिल येत होते त्यांना 15000,20000 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com