कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी दिल्या विद्यार्थांना शुभेच्छा
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात गणित व सांख्यिकीशात्र मंडळाचे नुकतेच उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, प्रमुख अतिथी म्हणून गणित विभाग प्रमुख डॉ. एस. एस. शेरेकर, गणित विभागाचे माजी प्रमुख डॉ. एस. डी. कतोरे, संगणकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. व्ही. एम. ठाकरे, मनिष देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी गणित व सांख्यिकीशास्त्र मंडळाच्या विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शन करतांना प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे म्हणाले की, गणिताच्या विद्यार्थांमध्ये शिस्त व जिज्ञासू वृत्ती असली तरच तो जीवनात प्रगती करू शकतो. डॉ. एस. एस. शेरेकर यांनी गणित व सांख्यिकीशात्र मंडळातील विद्याथ्र्यांना शुभेच्छा देऊन समितीचे महत्व आणि कामकाजाची माहिती दिली. डॉ. एस. डी. कतोरे यांनी गणिताचे समाजातील स्थान, गणिताचा अभ्यास करताना समर्पण महत्वाचे असल्याचे सांगितले. डॉ. व्ही. एम. ठाकरे यांनी संगणकशास्त्रामधील गणिताचे महत्व विषद करतांना गणित हा संगणकशास्त्राचा पाया असल्याचे सांगितले.
गणितीय समितीचे अध्यक्ष कपिल निळे यांनी मागील वर्षातील कार्यक्रमांचा वार्षिक अहवाल सादर केला व पुढील कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी नैसर्गिक फोटोग्राफी करणे, वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत विजयी विद्याथ्र्यांना पारितोषिके देण्यात आली. सर्वप्रथम संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीत व पुष्प सुमनांनी अतिथींचे स्वागत करण्यात आले. प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, डॉ. एस. डी. कतोरे यांच्या हस्ते गणित व सांख्यिकीशास्त्र मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. गणित मंडळाचे अध्यक्ष म्हणून विद्याथ्र्यांमधून श्री. कपिल निळे, उपाध्यक्ष कु. मोहिनी जाधव, सचिव कु. वैष्णवी गव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सांख्यिकीशात्र विभाग मंडळाचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थांमधून अभय तायडे, उपाध्यक्ष वैष्णवी चिरडे, सचिव रिया ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमासाठी शिक्षकवृद डॉ. एम. एस. देसले, एस. डी. रामटेके, ए. आय. देठे, ए. पी. निळे, डी. पी. राठोड, के. पी. काळे, बी. डी. देशमुख, ए. एस. रौंदळे, एस. ए. ए. कादीर तसेच विभाग प्रमुखांचे मार्गदर्शम मिळाले. कार्यक्रमाचे संचालन मोहिनी बनसोड व साक्षी वांगे यांनी, तर आभार श्रेया नगरगडे यांनी मानले.