पंतप्रधान मोदी आजच करणार सरकार स्थापनेचा दावा, TDP आणि JDU ने दिलं समर्थन पत्र

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. एनडीएकडून आजच सरकार स्थापनेसाठी एनडीएमधील घटक पक्षांचं समर्थन पत्र दिलं जाणार आहे. राष्ट्रपतींकडून 17 वी लोकसभा विसर्जित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार 17 वी लोकसभा विसर्जित करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीपत्रक जारी केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. भाजप बहुमतापासून लांब राहिल्याने त्यांना आता इतर मित्रपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. गेल्या दोन वेळा सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी पूर्ण बहुमत न मिळाल्याने त्यांना आता जेडीयू आणि टीडीपीची मदत घ्यावी लागणार आहे. भाजपला यंदा 240 जागा मिळाल्या आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता सरकार स्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती आहे. ८ जूनला मोदींचा शपथविधी सोहला पार पडणार असल्याची माहिती आहे.

एनडीएची बैठक

आज पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. नितीश कुमार हे निवडणुकीच्या आधीच इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये सहभागी झाले होते. आता आम्ही एनडीएमध्येच राहू असे जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी म्हटले आहे.

एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही वेळ न गमवता लगेचच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीकडून ऑफर देण्यात आली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर यंदाची निवडणूक विरोधकांसाठी संजीवनी ठरली आहे.

इंडिया आघाडीची बैठक

दुसरीकडे आज दिल्लीत इंडिया आघाडीची देखील बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील या बैठकीला येण्याची विंंनती करण्यात आली आहे. बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच फ्लाइटने पाटण्याहून दिल्लीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता कोणाचे सरकार स्थापन होणार आणि कोणाला काय हवे आहे, हे हळूहळू समोर येईल.

Source by loksatta

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू

Wed Jun 5 , 2024
नवी दिल्ली :-लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे एनडीएच्या घटक पक्षांची बैठक सुरू असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तसेच विविध घटक पक्षाचे नेतेही उपस्थित आहेत.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 @ फाईल फोटो Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com