अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील गंगाझारी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्व मालगाडी मध्ये फसून असलेल्या अगजर सापाला दिले जीवनदान, मुंबई हावडा रेल्वे लाईन वर मुबंई कडुन हावडा कडे मालगाडी जात असताना या दरम्याच्या गंगाझरी रेल्वे स्थानकावर मालगाडी उभी होती. तितक्यात एक इसमाला मालगाडीच्या इंजिन मध्ये असलेल्या बॉक्स मध्ये काही तरी हालचाल करत असल्याचे दिसून आले. जवळ जावून पाहिल्यावर त्या बॉक्स मध्ये अजगर साप आढळून आला, तो त्या बॉक्स मध्ये पुर्णतः फसलेला होता. त्यामुळे स्थानिक सर्प मित्राला पाचारण करण्यात आले. दोन तासाच्या अथक परिश्रमाने 8 फूट लांबीचा अजगर सापाला सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.