बारामती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

– दि. ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणार स्पर्धा : ११०० खेळाडूंचा सहभाग

मुंबई :- महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन बारामती येथील विद्या प्रतिष्ठाणच्या विद्यानगरी संकुलात दि ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ परिमंडलातील सुमारे अकराशे खेळाडू सहभागी होणार आहेत.

वीज कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २०२४-२५ च्या स्पर्धेचे यजमानपद बारामती परिमंडलाकडे आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. ५) सकाळी ९ वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादीकर राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक  दिलीप जगदाळे, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, नागपूर प्रादेशिक संचालक परेश भागवत, पुणे प्रादेशिक संचालक व आयोजन समितीचे अध्यक्ष भुजंग खंदारे, स्पर्धेचे मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके उपस्थित राहणार आहेत.

क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजता विद्या प्रतिष्ठाणच्या गदिमा सभागृहात संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे राहणार आहेत.

या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, ॲथलेटिक्स, कॅरम आणि ब्रिज आदी २२ क्रीडा प्रकारांचा समावेश असून वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रकारात विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य अभियंता व आयोजन समितीचे कार्याध्यक्ष धर्मराज पेठकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व आयोजन समितीचे सचिव  श्रीकृष्ण वायदंडे तसेच विविध समित्या पुढाकार घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चिखली येथे चक्रवर्ती राजाभोज जयंती मोठया उत्साहात संपन्न

Tue Feb 4 , 2025
कोंढाळी :- नजीकच्या चिखली , ता. काटोल , जि. नागपूर येथे युवा भोयर पवार मंच , शाखा – चिखली द्वारे २ फेब्रुवारी ‘ वसंत पंचमीच्या ‘ दिवशी भोयर , पवार समाजाचे आराध्य चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . सर्व प्रथम संपूर्ण गावात शोभायात्रेचे भ्रमण झाल्यानंतर निमंत्रित अतिथींच्या हस्ते दीप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!