नागपूर :- ७२ व्या अखिल भारतीय पोलीस वॉलिबॉल क्लस्टर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि. २९.०२.२०२४ रोजी दुपारी ०४.०० वा. नागपूर शहर पोलीस मुख्यालय येथील शिवाजी स्टेडियमवर थाटामाटात पार पडला, या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या महणून महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होत्या.
कार्यक्रमास उपस्थितांमध्ये पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्र कुमार सिंगल,आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग शिरीश जैन, सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर अश्वती दोर्जे, पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ. आरती सिंग, पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र लेरिंग दोर्जे, आयोजन सचिव अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ज्योत प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन केले. खो-खो चे आंतरराष्ट्रीय खेळाडू पोलीस शिपाई शुभम जांभळे नेमणूक पोलीस मुख्यालय, नागपूर शहर यांनी स्पर्धेची ज्वलंत ज्योत घेवून मैदानाची परिक्रमा केली. या स्पर्धेमध्ये भाग घेणान्या संपांच्या खेळाडूंनी राखीव पोलीस निरीक्षक तिवारी यांचे नेतृत्वात मैदानावर परेड केली. या परेडमध्ये राज्य पोलीस दल व केंद्रिय पोलीस दल मिळून एकूण ३८ पोलीस दल सहभागी होते. याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी खेळाचे महत्व सांगून उपस्थितांना संबोधित केले, आयोजन सचिव अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण एस.आर.पी.एफ. पुणे येथील पाईप बॅन्ड यांनी अत्यंत सुंदर वाद्य प्रदर्शन केले. नाशिक येथील पुपने सदस्यांनी आदिवासी लोककला नृत्य प्रदर्शन केले