छत्रपती शिवाजी महाराजांवर रेखाटलेले सुंदर चित्रे चिमुकल्यांना शिष्ठचाराचे धडे देणार-संदीप जोशी

‘भाजयुमो‘तर्फे जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रम उपक्रम
कतृत्वान महिलांचा गौरव आणि ई-श्रमिक व खासदार हेल्थ कार्डाचे वाटप 
 

नागपुर – बालशिवबांनी लहानपणीच माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारातून स्वतःला जाणून घेऊन, सोबतीला जिवाभावाचे मावळे घेऊन, रयतेचा खरा अर्थ जाणून घेतला व पुढे आयुष्यभर रयतेसाठी जिवाशी खेळत राहिले. महाराजांच्या जिवनापर चिमुकल्यांनी रेखाटलेले सुंदर चित्रे ही भविष्यात विद्यार्थ्यांना शिष्ठचार आणि सदाचाराचे धडे देणार, असे प्रतिपादन माजी महापौर संदीप जोशी यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नंदाताई जिचकार, भाजप दक्षिण-पश्चिम नागपूर अध्यक्ष किशोर वानखेडे तर स्वागताध्यक्ष नागपूर श र भारतीय जनता युवा मोर्चा षहर उपाध्यक्ष भूपेंद्र (गोलू) बोरकर यांची मंचावर उपस्थिती होती. विशेष पाहुण्यांमध्ये भाजप नेते भावानजी भाई पटेल, दक्षिण-पश्चिम नागपूर महामंत्री महेंद्र भुगवकर, दक्षिण नागपूर महामंत्री विकास बुंदे, प्रभाग क्रमांक-43 चे संयोजक व भाजप नगरसेवक संदीप गवई, प्रभाग क्रमांक-44 चे संयोजक रमेशजी कांगो, भाजप शहर उपाध्यक्ष संजय तिवारी, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष  डॉ. गिरीश चरडे, वैद्यकीय आघाडी डाॅ. श्रीरंग वरहाडपांडे, दक्षिण-पश्चिम नागपूर महिला अध्यक्ष वर्षाताई चौधरी, दक्षिण-पश्चिम नागपूर महिला महामंत्री जयश्री ताई पाठक, भाजपच्या जेष्ठ नेत्या उमाताई पिंपळकर, सभापती वंदना भगत, भाजप नगरसेविका विशाखा बांन्ते, भाजप नगरसेविका भारती बुंदे, नगरसेविका लताताई काडघाये, नगरसेविका विशाखाताई मोहोड, माजी नगरसेविका सुमित्राताई जाधव, महिला वार्ड अध्यक्ष रेखाताई शिरपूरकर, शिला काळे, बबिता ताई डेलीकर, रेश्मा कुरैशी, रंजना मगदे, नलीनी काटे, अदिती व्यवहारे, नलीनी वंजारी, चैताली वानखेडे आदींची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी महापौर संदीप जोशी आणि नंदाताई जिचकार यांच्या हस्ते नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष भूपेंद्र (गोलू) बोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी महापुषांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे शुभारंभ केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविका प्रिया भूपेंद्र (गोलू) बोरकर यांनी केली. यानंतर भाजयुमोद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त शि वाजी जन्मोउत्सवाअंतर्गत आयोजित 18 वर्षाखालील मुला-मुलींची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनीपर चित्रकला स्पर्धेतील 23 विजेत्यांना पारितोशिक, 25 कर्तबगार प्रतिभावंत महिलांचा गौरव सोहळा तसेच जवळपास पाचशे ई-श्रमिक, आत्मनिर्भर निधी योजना, खासदार हेल्थ कार्ड व दिव्यांग नोंदणीच्या कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेे. कार्यक्रमाचे संचालन स्मिता बालपांडे यांनी तर आभार यश चौधरी यांनी मानले. ‘भाजयुमो‘तर्फे आयोजित विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रभाग क्रमांक-44 चे अध्यक्ष संजय वर्मा, प्रभाग क्रमांक-44 चे अध्यक्ष नितिन कठाने, प्रभाग क्रमांक-44 चे अध्यक्ष लक्ष्मीकांत दडवे, महामंत्री नरेश चौहान, मंगेश  गाखरे, गणेश ठाकूरसह भारतीय जनता पार्टीतील प्रभाग क्रमांक-43-44 चे पदाधिकारी व कार्यकर्त्यां तसेच नागरिकांनी परिश्रम घेतल्याचे माहिती भूपेंद्र (गोलू) बोरकर यांनी दिली.

राहुल गुप्ता प्रथम तर विजय ठवकर द्वितीय

भाजयुमोद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी जन्मोउत्सवाअंतर्गत चित्रकला स्पर्धेत चिमुकल्यांनी महाराजांविषयी मुलांनी ऐकलेले प्रसंग, त्यांच्या कथांच्या आधारे बालचमूंनी सुंदर चित्रे रेखाटली. मुलांनी रेखाटलेल्या सव्वाशे चित्रांमुळे वातावरण ‘शिवमय’ झाले होते. यावेळी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील कुठल्याही प्रसंगाचे चित्रांचे प्रदर्शनही करण्यात आली. स्पर्धेत विजेता राहुल गुप्ताला 2 हजार 101 रोख व सन्मानचिन्ह, उपविजेता विजय ठवकरला 1 हजार 501 रूपये रोख व सन्मानचिन्ह तर तृतीय स्थान पटकाविणारी खुशी प्रजापतीला 1 हजार 101 रूपये रोख व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नशा को भी फीका करती हैं 'वो' ....

Thu Mar 10 , 2022
 – भूमिका के अर्थ के साथ कर रही न्याय  एक सक्षम घर में बेहद खूबसूरती ने जन्म ली,नाजों से पली.इसलिए मिजाज भी इनके बिंदास हैं.जिसे कई नामों से जाना जाता हैं उनमें से एक नाम भूमिका भी हैं. नाम रखने वाले ने तब उतना नहीं सोचा होगा कि भूमिका नाम क्यों रख रहे हैं. यह हमेशा चाहने वालों की भीड़ में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com