येरखेड्यात प्रेमप्रकरणातून ब्लेड च्या धाकावर महिलेला जीवे मारण्याची धमकी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 2 ऑगस्ट – प्रेमाच्या विरहात एकाकी पडलेल्या तरुणाला प्रियेसीचे लग्न दुसरीकडे ठरल्याची कुणकुण लागताच आरोपी तरुणाने येरखेड्यातील दुर्गा चौक असलेल्या प्रियेसी च्या घरात अवैधरित्या शिरून हातात धारदार ब्लेड घेऊन आपल्या मुलीचे लग्न दुसरीकडे का ठरविले?अशी विचारणा करीत तरुणीला व तीच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत स्वतःचेही बरे वाईट करणार असल्याचा धमकीवजा दिल्याची घटना सायंकाळी सहा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी महिलेने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन रामराव बलगार वय 28 वर्षे रा जरीपटका नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अटक आरोपी सचिन बलगार व पीडित फिर्यादी ची मुलगी हे दोघेही नागपूर एलआयसी चौकात असलेल्या एका खाजगी रुग्णलयात खाजगी नोकरी करायचे.दरम्यान या दोघात झालेल्या प्रेमाचे अवघ्या काही दिवसातच ब्रेकअप झाले व तरुणीने आपला जॉब सोडून यशोधरा नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात जॉब करायची मात्र इकडे प्रेमाच्या विरहात असलेल्या या तरुणाने कित्येकदा या तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याने यशोधरा नगर पोलीस स्टेशन ला आरोपी तरूनाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.तर इकडे सदर मुलीचे लग्न जुडल्याची माहिती कळताच आरोपीने सदर तरुणीच्या घरात शिरून तरुणीच्या आईला व तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध भादवी कलम 452, 506 (2)अनव्ये कायदेशीर गुन्हा नोंद करीत अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com