संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय जनता पार्टी कामठी शहर अधिवेशन स्थानिक गंज के बालाजी मन्दिर सभागृहात नुकतेच पार पडले.या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अधिवेशनात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाला मिळालेल्या यश अपयश यावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश टाकला व पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत कामठी विधानसभा मतदार संघात पक्षाची रणनीती तयार करण्यासंबंधीचे मौलिक मार्गदर्श न करून आगामी कामठी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर कार्यकर्त्यांनी आणखी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
यावेळी कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अजय बोढारे, माजी जी प सदस्य अनिल निधान, मनीष बाजपेयी, राजेश रंगारी, आदर्श पटले,अजय अग्रवाल, अनुराधा आमीन,संजय कनोजिया, कपिल गायधने, लालसिंग यादव इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मनीष वाजपेयी,लाला खंडेलवाल, पंकज वर्मा, चंद्रशेखर तुप्पट,विजय कोंडुलवार,कपिल गायधने, कुणाल सोलंकी,कुंदा रोकडे,रोशनी कानफाडे,गायत्री यादव,दीपक नेटी आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका साकारली.