विदर्भ स्तरीय कॅरम स्पर्धेत इरशाद अहमदला विजेतेपद तर गुरुचरण तांबेला उपविजेतेपद

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- माजी आमदार स्वर्गीय यादवराव भोयर क्रीडा महोत्सवा अंतर्गत इमलीबाग सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेत इरशाद अहमद ला विजेते पद तर गुरुचरण तांबे याला उपजेतेपद कामठी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मोहम्मद शहाजाहा शफाहत अंसारी यांचे हस्ते विजेता इरशाद अहमद व उपजेता गुरुचरण तांबे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले .

यावेळी स्पर्धेचे संयोजक मोहम्मद इरशाद शेख ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसचे प्रभारी कुमार रोहित, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव याज्ञवल्यकय जिचकार ,आरिफ शेख ,अश्विन बैस ,आशिष मंडपे, आरिफ अली ,मोबीन अहमद, अनिरुद्ध पांडे ,साजिद अंसारी, मझर हुसेन हैदरी, साजिद कमाल, इरफान अहमद ,ईसरत खान, ज्योती कारेमोरे ,फर्मान खान उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक मोहम्मद इरसाद शेख यांनी केले संचालन सोहेल अंजूम यांनी केले व आभार प्रदर्शन मोहम्मद रशीद अंसारी यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाळांच्या माध्यमातून देशविचारांशी एकरूप , तन्मय नागरिक घडावा - ज. स. जनवार जन्मशताब्दी समारोपात सरसंघचालकांची अपेक्षा

Tue Feb 27 , 2024
नागभीड :- शाळांच्या माध्यमातून आपल्याला या देशाशी एकरूप असणारा, तन्मय असणारा तसेच या देशाच्या विचारांशी आणि आचारांशी बांधील असलेला नागरिक घडवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. यातूनच त्या व्यक्तीचा विकास होईल, भारत मोठा होईल आणि जगाला सुख-शांतीचा मार्ग गवसेल, असेही ते म्हणाले. नागभीडच्या गोंडवन विकास संस्थेचा सुवर्ण जयंती महोत्सव आणि स्व. ज. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com