मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात येत आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण ११ सखी मतदान केंद्रे असणार आहेत. ११ सखी मतदान केंद्रापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ६ तर मुंबई दक्षिण मतदारसंघात ५ सखी मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असून धारावी मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मतदान केंद्र क्रमांक १०० आणि धारावी ट्रान्सलेट कॅम्प मनपा शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक ८२ ही धारावी मतदारसंघातील दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत.

सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. स्त्री – पुरुष समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव ठेण्यात आले आहे. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात येते. जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते.

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण - आयुषी सिंह

Tue May 14 , 2024
– हिवताप चाचणी प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन गडचिरोली :- हिवताप प्रतिबंध विशेष कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकाऱ्यांकरिता मलेरिया मायक्रोस्कोपी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते व आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com