दीड दिवसांचे श्रीगणेशाच्या १२७४ मूर्तींचे विसर्जन  

– झोननिहाय ३२ विसर्जन स्थळे : सर्वाधिक विसर्जन धरमपेठ झोनमध्ये

नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात प्रत्येक झोनमध्ये विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी (ता.२१) शहरातील विविध विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले आहे. दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी मनपाद्वारे झोननिहाय ३२ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये १२७४ मूर्तींचे विसर्जन झालेले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील सर्व विसर्जन स्थळे सज्ज करण्यात आलेली आहेत. विसर्जन स्थळांवर व्यवस्था तसेच इतर सर्व बाबींकडे आयुक्तांद्वारे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.

बुधवारी २० सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या श्रीगणेशाचे शहरात सर्वत्र विसर्जन झाले. तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णत: बंदी असल्यामुळे मनपाच्या आवाहनावरून नागरिकांनी विसर्जन टँकमध्ये मूर्तींचे विसर्जन केले. मनपाद्वारे धरमपेठ झोनमध्ये सर्वाधिक १४ विसर्जन टँक तर यापाठोपाठ नेहरूनगर झोनमध्ये ६, सतरंजीपुरा झोनमध्ये ५ आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये ३, हनुमान नगर झोनमध्ये २, धंतोली आणि मंगळवारी झोनमध्ये प्रत्येकी १ टँक उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. या विसर्जन टँकमध्ये एकूण १२७४ मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये १२४४ मातीच्या मूर्ती तर ३० मूर्ती पीओपीच्या आढळून आल्या. झोननिहाय विसर्जन टँकमध्ये पीओपीच्या २२ मूर्ती धरमपेठ झोनमधील तर ६ मूर्ती सतरंजीपुरा आणि २ मूर्ती नेहरूनगर झोनमधील विसर्जन टँकमध्ये आढळून आल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोणावळा पर्यटन विकासासाठी प्रकल्प अहवाल महिन्याभरात तयार करावा - उपमुख्यमंत्री अजित पवार

Thu Sep 21 , 2023
मुंबई :- लोणावळा येथील टायगर, लायन्स पॉइंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com