संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या आवंढी गावात अवैध दारू विक्री जोमात सुरू झाली असून या गावात मागील काही वर्षांपूर्वी सन 2014 मध्ये निलेश वाघमारे नामक इसमाचा दारू च्या वादातूनच निर्घृण खून करण्यात आला होता हे इथं उल्लेखनीय…आजच्या स्थितीत त्याच गावात पुनश्च अवैध दारू विक्रीला उधाण आल्याने स्थानिक प्रशासन अजून एका खुनाच्या प्रतीक्षेत आहे का?अशी विचारणा येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रा प निवडणूकाचे परिणामतः काही गावात अजूनही राजकीय वातावरण तापले आहे त्यात कुठे नैराश्य तर इतर काही समस्या उदभवल्या आहेत अशाच प्रकारच्या समस्येमुळे आवंढी गावात सुरू असलेल्या दारू विक्री व्यवसायातून काही मद्यपी आपली दारूची नशा भागवत आहेत तेव्हा गावात कुठलीही अनुचित घटना न घडता गावात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी यासाठी संबंधित विभागाने कंबर कसून या अवैध दारू विक्रीला लगाम लावावा अशी मागणी जोर धरत आहे.