महादूला नगर पंचायतच्या वरिष्ठ लिपीकाला लाच घेताना रंगेहाथ अटक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 19 :- कोरोना काळात व दसरा मेळावा 2022 दरम्यान महादूला नगर पंचायत च्या वतीने करण्यात आलेल्या बॅरिकेटिंग चे बिल काढण्यासाठी तक्रारदाराला महादुला नगर पंचायत चे वरिष्ठ लिपीकासह अन्य दोघांनी 26 हजार 500 रुपयांची लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती आज 19 जानेवारीला 21 हजार 500 रुपयेची लाच रक्कम स्वीकारली यासंदर्भात लोकसेवकाने आपल्या आर्थिक फायद्याकरिता लाचेची मागणी केल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्वरित धाड घालून आरोपी वरिष्ठ लिपीकास ताब्यात घेऊन कोराडी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपीचे नाव . अशोक श्यामरावजी कुथे,वय ४५ वर्षे, पद – वरिष्ठ लिपिक नगर पंचायत,महादुला, कोराडी, नागपूर राहणार – बजरंग नगर,हनुमान मंदीर जवळ, महादुला,कोराडी, नागपूर असे आहे तर अटकेबाहेर असलेल्या इतर दोन आरोपीमध्ये (वर्ग ३) मयुर रविन्द्र धोटे ,वय ३२ वर्षे, पद – लेखापाल,नगर पंचायत,महादुला, कोराडी, नागपूर राहणार – एलेक्सीस हॅास्पीटल मागे, मानकापूर, नागपूर तसेच (वर्ग ३) रितेश शिंदे ,वय ३२ वर्षे, पद – कंत्राटी कॅाम्प्युटर आँपरेटर,नगर पंचायत,महादुला, कोराडी, नागपूर राहणार – कन्हान, नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तक्रारदार यांनी कोरोना काळातील व दसरा २०२२ मध्ये नगर पंचायत महादुला यांचे वतीने केलेल्या बॅरीकेटींगचे बिल काढण्याकरीता वर नमुद तिन्ही आरोपीने मिळुन २६,५००/- ची मागणी करुन तडजोडी अंती २१,५००/- रक्कम यातील आरोपी क्रं. १ अशोक कुथे यांनी लाच रक्कम स्विकारली. नमूद आरोपी यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता लाच रकमेची मागणी करून स्विकारली. पोलीस स्टेशन कोराडी, नागपूर शहर येथे गुन्हा दाखल केला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले असून आरोपी क् 2 व 3 यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही यशस्वी कारवाही , ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर चे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र,नागपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनार्थ लाप्रवि, नागपूरच्या पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे,पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे , प्रीति शेंडे ,पोलिस निरीक्षक, नापोशी सारंग बालपांडे, नापोशि अस्मिता मेश्राम, करुणा सहारे नापोशी अमोल भक्ते सर्व ला. प्र. वी.नागपूर यांनी केली आहे.        नागपुर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

युनूस शेख,पोलीस निरीक्षक 

अँन्टी करप्शन ब्युरो, नागपूर

दुरध्वनी 0712-2561520

@ टोल फ्रि क्रं. 1064

Next Post

कठोर परिश्रम हाच यशप्राप्तीचा राजमार्ग  - न्या. जयदीप पांडे

Fri Jan 20 , 2023
चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप नागपूर : अनेक महापुरुषांनी शुन्यातून आपले अस्तिव निर्माण केले आहे. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. कठोर परिश्रम हाच यशाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयदीप पांडे यांनी आज येथे केले. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातर्फे आयोजित चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com