विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ

नागपूर :- राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये आज उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.

लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जनत करुन आणि मुक्त नि:पक्षपाती शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलेाभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रभान पराते, धनंजय सुटे, तहसिलदार महेश सावंत, आर.के.डिघोळे, संध्या खोडे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

NewsToday24x7

Next Post

मानांकीत इशानला बिगरमानांकीत राहुलचा धक्का, खासदार क्रीडा महोत्सव : कॅरम स्पर्धा

Fri Jan 26 , 2024
नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेमध्ये पाचवा मानांकीत इशान साखरेला बिगरमानांकीत राहुल वर्माने पराभवाचा धक्का देत स्पर्धेत आघाडी घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे स्पर्धा सुरू आहे. गुरूवारी (ता.25) झालेल्या पुरूष एकेरी सामन्यात पाचवा मानांकीत इशान साखरेचा बिगरमानांकीत राहुल वर्माने 19-16, 16-16, 25-1 असा पराभव करीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com