संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लाचेत अडकल्याच्या बातम्या नेहमी ऐकिवास येत असूनही लाच प्रकरणे थांबण्यपेक्षा उलट गतीने वाढत आहेत त्यात पोलीस विभाग मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे.नुकतेच एका विनयभंगाचा गुन्हा दाखल न व्हावा यासाठी संबंधितांकडून तडजोड करून पैश्याच्या जोरावर फिर्यादीची दिशाभूल करून आरोपीवृत्तीच्या इसमाची पाठराखण करण्यात आली.असे बरेच प्रकरणे वाढीवर आहेत .तेव्हा कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी होत असल्यास याबाबत तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र नागपूरकडे तक्रार दाखल करता येते.
शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी किंवा त्याच्या वतीने खाजगी इसम, एजंट यांनी कोणतेही शासकीय कामे करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यक्तिरिक्त रकमेची मागणी केल्यास त्यासंबंधी तक्रार दाखल करता येऊ शकते.तेव्हा या वाढीव भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दूरध्वनी क्रमांक 0712-2561520 वर सुद्धा संपर्क साधता येतो.