– विवाह सोहळ्याचे १५ वे वर्ष
– आजपर्यंत १२११ जोडप्यांचे शुभमंगल सावधान
रामटेक :-चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम, मनसर तथा आधार बहुउद्देशीय संस्था, महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने मनसर येथील प्रख्यात रामधाम तिर्थक्षेत्र येथे येत्या दि. २९ एप्रील ला सकाळी १० वाजता आदर्श सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांनी या भव्य विवाह सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहण पर्यटक मित्र तथा रामधाम तिर्थक्षेत्राचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी केलेले आहे.
विशेष म्हणजे आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १५ वे वर्ष असुन ज्यांची लग्न करायाची सोय तथा तेवढी कुवत नाही अशा हजारो जोडप्यांचे येथे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी येथे निशुल्क विवाह आटपवुन दिलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासुन त्यांचे हे कार्य अविरत सुरु असुन आजपावेतो येथे तब्बल १२११ जोडप्यांचे शुभमंगल सावधान गुण्यागोविंदात संपन्न झालेले आहे. सोहळ्यामध्ये बुद्ध समाज, आदिवासी समाज, आंतरजातीय आणि ओ. बी. सी. समाजाचे जोडपे विवाह बंधनात बांधल्या जातात. विवाह सोहळ्यादरम्यान येथे परीसरातील हजारो नागरीक उपस्थित राहातात तेव्हा त्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था तथा वधु – वरांना आहेर सुद्धा देण्यात येत असतो. यावर्षीही सामुहिक विवाह सोहळा २०२३ चे येत्या २९ एप्रील ला करण्यात आले असुन ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांनी सदर सोहळ्याला हजर राहुन आशिर्वाद देण्याचे आवाहण पर्यटक मित्र तथा सरपंच संघटन चे प्रदेश अध्यक्ष अशा उपाधी लाभलेले रामधाम तिर्थक्षेत्राचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी केलेले आहे.