
कन्हान :- यशवंत विद्यालय वराडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबा साहेबाना अभिवादन करून शालेय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
शुक्रवार (दि.६) डिसेंबर २०२४ ला यशवंत विद्यालय वराडा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे संचालक भुषण निंबाळकर व प्रमुख अतिथी ग्रा प वराडा सरपंच सुनिल जामदार यांचे हस्ते डॉ बाबा साहेब आंबेडकर व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सुनिल जामदार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष भुषणराव निंबाळकर हयांनी दोन्ही महापुरूषा च्या जिवनावर विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. तद्ंतर मान्यवरांच्या हस्ते फित कापुन विज्ञान प्रदर्शनी चे उदघाटन करून विद्यार्थ्यानी तयार केलेले विज्ञान मॉडेल ची पाहणी करित विद्यार्थ्या कडुन विज्ञान प्रयोगा विषयी माहिती जाणुन घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के बी निंबाळकर, विज्ञान शिक्षिका अर्चना शिंगणे, एस पी गावंडे, शिक्षक आर बी गभणे, आर व्ही गणविर शिक्षकेत्तर कर्मचारी एम व्ही रहाटे, डी एम पांडे सह विद्यार्थ्यांनी सहकार्य केेले.


