अमरावती :- विदर्भ कुंभार समाज सुधार समिती महिला मंडळाच्यावतीने नुकतेच हुन्नर 2023 या सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहमिलन कार्यक्रमाचे बडनेरा रोडवरील शशीनगर येथील संत गोरोबा काका सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवांनी या कार्यक्रमात मोठा सहभाग घेतला. सर्वप्रथम गोरोबा पूजन झाले. त्यानंतर स्नेहल पसारी हिने स्वागतनृत्य सादर केले. तर निर्मला नांदुरकर यांनी स्वागतगीत गायिले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंग मंचावर प्रभा भागवत, अपर्णा खांडेकर, गोकर्णाबाई कोल्हे, निर्मला नांदुरकर, सविता कोल्हे, लता कोल्हे, प्रा. वैशाली नांदुरकर, ज्योती बावसकर, अल्का खानझोडे, सांगिता साळविकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नृत्यकला स्पर्धेत नेहा सरोदे प्रथम, प्रेम गावंडे व्दितीय व पायल नांदुरकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. रांगोळी स्पर्धेत खुशी चिलूरकर प्रथम, वैष्णवी माहुलकर व्दितीय, शिवानी काळविकर तृतीय, उखाणे स्पर्धेत स्वाती नांदुरकर प्रथम, माया नांदुरकर व्दितीय, प्रज्ञा राऊळकर तृतीय, बचाव स्पर्धेत वैशाली नांदुरकर प्रथम, प्रज्ञा राऊळकर व्दितीय, कविता तायडे तृतीय, पाककला स्पर्धेत माला चांदुरकर प्रथम, पुनम तांबट व्दितीय, योगिता वडूरकर तृतीय, फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धेत खुशी चिलूकर प्रथम, संगीत खुर्ची स्पर्धेत माया नांदुरकर प्रथम, रेखा चोंडके व्दितीय व वैशाली सरोदे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण शुभम वाडेकर, गौरी राठी व लता कोल्हे यांनी केले. याप्रसंगी बोलतांना प्रभा भागवत म्हणाल्या, समाजातील युवक, युवती, महिलांना त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले. समाजाला उंच भरारी घ्यावयाची आहे, त्यासाठी कोणत्याही अपयशाला खचून न जाता आत्मविश्वास, निर्धार, चिकाटी आणि प्रबळ महत्वाकांक्षा ठेवून जीवन सुखी व आनंदी बनवावे. यावेळी त्यांनी अमेरिकेमधील एका तरुणीच्या यशाचे उदाहरणही दिले. निर्मला नांदुरकर म्हणाल्या, समाजातील रुढी – परंपरेला बाजुला सारुन सर्वांचा आदर करावा. अर्चना खांडेकर म्हणाल्या, महिलांनी आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे उद्योग करावेत व आपल्या कुटुंबाला हातभार लावावा. कार्यक्रमाला विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव शेंडोकार, पंजाबराव काकडे, डॉ. श्रीराम कोल्हे, भगवानराव जामकर, सुरेश नांदुरकर, अरुण पोहणकर, गजानन तांबटकर, सतिश गावंडे, सुरेंद्र सरोदे, सुनिल भागवत, संजय साळविकर, मधुकर खांडेकर, शंकरराव धामणकर, विनायक तायडे, विलास धामणकर, रुपराव खोपे, गजानन वडूरकर, रमेश अंबुलकर, दिनेश टेंभरे, विनोद मेहरे, नंदकिशोर काकडे, सुनिल काळकर, राजेंद्र भागवत, राजंेद्र अंबुलकर, दिलीप खांडेकर, दर्यापूर येथील सुभाष वडूरकर, नंदकिशोर काळकर, विजय गुजरे, मोहन नांदुरकर यासह समाजबांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाला आयोजन समितीचे नंदा पोहणकर, सविता कोल्हे, सुनिता धामणकर, सविता काकडे, सुषमा काळकर, मंदा काळे, संगिता साळविकर, वंदना काळकर, सुषमा काकडे, वैशाली सरोदे, गोकर्णा कोल्हे, रक्षा काकडे, शिवानी काळविकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली नांदुरकर व स्वाती साळविकर यांनी, तर आभार संगिता कोल्हे यांनी मानले.
विदर्भ कुंभार समाज सुधार समिती महिला मंडळाचे हुन्नर 2023 सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहमिलन उत्साहात संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com