सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६४ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :-  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (ता.५ जून) रोजी शोध पथकाने ६४ प्रकरणांची नोंद करून ३२,३०० रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकण्याप्रकरणी ( रु २००/- दंड ) या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत २७ प्रकरणांची नोंद करून १०,८०० रुपयांची वसुली करण्यात आली.कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून रु २४०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत ३ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीच्या व्यावसायिकांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. १०००/- दंड) या अंतर्गत ३ प्रकरणांची नोंद करून रु ३००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून रु २६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास २ प्रकरणांची नोंद करून रु २००० दंड वसूल करण्यात आला आहे.

NewsToday24x7

Next Post

मोदी सरकारमुळे विकसित, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांचे प्रतिपादन

Tue Jun 6 , 2023
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विकसित, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले आहे . हे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ९ वर्षांत अनेक निर्णय घेतले असून या प्रयत्नांना जनतेची साथ मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीने देशभर महाजनसंपर्क अभियान आयोजित केल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी यांनी सोमवारी दिली. मोदी सरकारच्या ९ […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com