नागपूर :- दक्षिण नागपूर येथील अमरनगर हनुमान मंदिर समाजभवन येथील निःशुल्क नेत्र तपासणी व दंत मुख रोख निदान शिबिर रविवारी 12 मे रोजी, शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महात्मे नेत्र पेढी व नेत्र रुग्णालय आणि डॉ. प्रेमस मल्टीस्पेशलिटी डेंटल क्लिनिक नागपूर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 300 रुग्णांनी लाभ घेतला. डोळे तपासणी 200 रुग्ण, त्यामध्ये 24 रुग्ण मोतीबिंदू शस्त्र क्रियेसाठी पात्र ठरलेत. तसेच 76 रुग्णांनी दंत तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमात नेत्र रोगतज्ञ डॉ. अश्विन गोविल व सानिया बावनकुळे, पर्वणी श्रीपात्रे, संकेत शंभरकर तसेच दंत रुग्ण तपासणी डॉ. प्रेम निवांत व डॉ.एकता कुऱ्हाडे यांनी तपासणी केलीत. या कार्यक्रमाला नगरसेविका माधुरी ठाकरे व प्रवीण ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निशुल्क वैद्यकीय तपासणी व औषधी वाटप करण्यात आले तसेच अल्प दरात चष्मा करून देण्यात आले.
आयोजन पद्मश्री डॉ. विकास महात्मे तसेच अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर, सचिव वसंतराव ईजनकर, गणपतराव निंबाळकर, डॉ. राजेश कुऱ्हाडे, विजयराव पवार, प्रविण काटले,आशिष निंबाळकर, बालाजी भोयर यांनी अथक परिश्रम घेतलेत. वस्तीतील नागरिकांनी व रुग्णांनी एकूण 600 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. अमरनगर ज्येष्ठ मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देविदास आगरकर, गणपतराव निंबाळकर, वसंतराव इझनकर, राजेश कुऱ्हाडे, संतोषराव भोयर, रमेशराव जिल्हारे, विजयराव पवार, विनायकराव घोरमाडे, मोहनराव धवल, गौतमराव वरघट, बालाजी भोयर, माधवराव शिरपूरकर, जया रासेकर, सविता धनझोडे, या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.