नागपूर:-दिनांक १३,०७,२०२३ रोजी मा. तदर्थ जिल्हा व अति सत्र न्यायाचीश क. ७८. एस. एम. कणकद यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. ६१३/२०२१ मधील पो. ठाणे कोराडी येथील अप.क्र. २१६/२०२१ कलम ३०२, २०१. ३४ भादवि या गुन्हयातील आरोपी क. १) रवि नारायण पराडे, वय ५६ वर्ष, रा. वैष्णवमाता नगर हुडकेश्वर, नागपुर २) सुभाष सखाराम भाकरे वय ५६ वर्ष रा. नेहरूनगर हुडकेश्वर याचे विरूध्द साक्षी पुरावाअंती गुन्हा शाबीत झाल्याने आरोपींना कलम ३०२ भा. दं. वि. मध्ये आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा, व प्रत्येकी ५,०००/ रु दंड, आणि दंड न भरल्यास ०३ महीना अतिरीक्त कारावास शिक्षा. तसेच, कलम २०१ भा. दं. वि.मध्ये ०१ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १,०००/- रू दंड, आणि दंड न भरल्यास ३ महीने अतिरीक्त कारावास शिक्षा ठोठावली.
दिनांक १६,०७,२०२१ चे २२.३० वा. सुमारास पोलीस ठाणे कोराडी हद्दीत सोहेल अहेमद सेलिब्रेशन लॉन भोसला मिलिटरी शाळेजवळ, चक्की खापा, कोराडी येथे फिर्यादीचा मोठा भाऊ (मुक्तक) नामे सचिन मारोतराव इरपाते वय ४० वर्ष, रा. संजय गांधी नगर हुडकेश्वर हे आरोपीसोबत घटनास्थळी नाली खोदकामाचे कामाकरीता तेथेच राहत होते. मृतक याने आरोपींना शिवीगाळ केल्याने, आरोपीनी संगणमत करून रागाचे भरात येवुन तेथेच ठेवलेल्या टिकास व फावड्याने त्याचे डोक्यावर मारून जिवानिशी ठार केले. व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतकाचे तसेच स्वताः चे कपडे धुवून काढले व मृतकाची बॉडी लॉनचे खडयात टाकून दिली. अशा फिर्यादी शितल कृष्णा उईके वय ३४ वर्ष ग. लॉ २६५ संजय गांधी नगर हुडकेश्वर यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस ठाणे कोराडी येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना दिनांक १७.०७.२००१ रोजी अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन सपोनि विजय भिसे यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड.मोटघरे यांनी तर आरोपी तर्फे ॲड. जे.जे. खरा व ॲड. सुरेखा बोरकर यांनी काम पाहिले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा, हरिचंद्र तबले, हंसराज मडावी यांनी काम पाहिले.