गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटुंबियांना ॲक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

पोलीस अधीक्षक या. यांचे हस्ते १७ लाख रुपयाचा धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन 

गडचिरोली :-बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किया त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श अॅक्सिस बँकेने ठेवला आहे. दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी वसंत विस्तारी वैद्य यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर माठे संकट कोसळल, ही समस्या ओळखुन अॅक्सिस बँकने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी संध्या वसंत वैद्य यांना आर्थिक मदत स्वरूपात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते २० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता  तसेच अॅक्सिस बँकेचे सर्कल हेड राजीव कुमार, कलस्टर हेड अजीत श्रीवास्तव व शाखा व्यपस्थापक, संपेल राजेंद्र कानार यांचे उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबीयांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com