दीक्षाभूमी, शांतीवन, ड्रॅगन पॅलेसच्या विकासाबाबत प्रशासकीय आढावा बैठक घ्या – ॲड. धर्मपाल मेश्राम यांची प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना मागणी

नागपूर : नागपूर येथील दीक्षाभूमी, शांतीवन चिंचोली व ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी येथील विविध विकासकामे खोळंबलेली असून या स्थळांना शासनाने दिलेल्या निधी संबंधी प्रशासकीय आढावा बैठक घेउन अडचणी मार्गी लावाव्यात, अशी मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. बौद्ध अनुयायांच्या उपरोक्त तिनही श्रद्धा स्थळांच्या विकासासंबंधी त्यांनी शिष्टमंडळासह ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे व प्रदेश सचिव अर्चना डेहनकर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूर येथील दीक्षाभूमी, शांतीवन चिंचोली व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल या ठिकाणी विविध विकास कामे करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आता पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी या स्थळांच्या विकासासाठी भरघोष निधी दिला आहे. याशिवाय केंद्र शासनासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनद्वारे सुद्धा विकास निधी तिनही स्थळांना प्राप्त झालेला आहे.

मात्र पर्याप्त निधी प्राप्त होत असतानाही या तिनही स्थळांच्या विकासाचे कार्य अनेक वर्षांपासून रखडलेलेच आहे. त्यामुळे समाजातही असंतोषाची भावना आहे. असंख्य बौद्ध, आंबेडकरी अनुयायांच्या भावनेशी निगडीत तिनही स्थळांच्या विकासाची गती संथ होण्यामागील तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करून विषय मार्गी लावण्यासाठी यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर बैठक घेण्याची मागणी निवेदनाद्वारे ॲड. धर्मपाल मेश्राम व शिष्टमंडळाने केली.

ॲड. मेश्राम यांच्या मागणीवर दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाला तात्काळ प्रशासकीय बैठक बोलावण्याचे निर्देशित केले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामगढ येथे महिला आरोग्य समितिची बैठक 

Wed Mar 1 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी – प्रभाग 15 रामगढ कामठी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 65 मधे महिला आरोग्य समितिची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली, संबोधि महिला आरोग्य समितिच्या अध्यक्ष निर्मला भारत,माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी महिला आरोग्य व घेण्यात येणारी काळजी या बाबत मार्गदर्शन केले या वेळी आशा पर्यवेक्षिका रश्मि धसकर, आशा वर्कर सपना भिमटे,अंगणवाडी सेविका तारा जगणे,मदतनिस संजू रामटेके, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com