– श्री सिध्दीविनायक सेवा ट्रस्टद्वारे भव्य शोभायात्रा
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक यांची उपस्थिती
नागपूर :- हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आनंदाची अपेक्षांची, ध्येय, आकांक्षांची उंच गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपल्या नव्या पिढीला कळावी, त्यांच्यात या परंपरेचे बीज रूजावे व त्यांनी ही परंपरा संस्कृती पुढे प्रवाहित करावी या उदात्त हेतून श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट झिल्पी तसेच लक्ष्मीनगर, बजाजनगर, सुरेंद्रनगर भागातील विविध संस्थांच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे. या समारंभात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक गोडबोले यांची विशेष उपस्थिती असेल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत शंतनू येरपुडे, गजानन निशितकर, मनोज देशपांडे, जयंता आदमने, प्रकाश रथकंटीवार आदी उपस्थित होते.
देशात घडत असलेल्या घटनांमुळे आपणा स्वत:सह आपल्या पुढच्या पिढीला चिंतन करण्याची वेळ आज आलेली आहे. ‘काश्मीर फाईल’ चित्रपट, आपल्या भागात होणारी लव जिहादची प्रकरणे, नवीन सुरू झालेले जमीन जिहादचे प्रकरण, दिल्ली येथील श्रद्धा मर्डर केस अशा अनेक प्रकरणांमुळे आज चिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपण आपल्यातला ‘स्व’ शोधण्याकरीता आणि जागवण्याकरीता गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी २२ मार्च रोजी ५१ फूट उंच गुढी उभारून सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक रामरक्षा तसेच सामूहिक आरती मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा लक्ष्मीनगर चौकात घेण्याचे निश्चित केलेले आहे. तसेच यावेळी तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी शोभायात्रा देखील काढण्याचे निश्चित केले आहे. यामधे प्रभू श्रीरामाची पालखी, कलशधारी महिला, भजन पथक, छत्तीसगडी नृत्य, लेझीम पथक, धुमाल, स्केटिंग, मुलांची वेशभूषा, आखाडा, शिवकालीन प्रात्याक्षिके, ढोल-ताशा पथक, बाहुबली हनुमान यांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपण सर्वांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन या ‘स्व’जागृतीच्या कार्यक्रमामध्ये मोठया संख्येने उपस्थित राहून हिंदू नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी केले.
नूतनवर्ष अभिनंदन समारोह समितीचे सर्वश्री मनोज देशपांडे, गजानन निशीतकर, जयंता आदमने, शंतनू येरपुडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशिष पुसदकर, अमोल वटक, अजय डागा, दिपक वानखेडे, मंगेश उपासनी, सौ. काजल बागडी, अनुसया गुन्ता, डॉ. माधुरी इंदुरकर आदी नववर्षाच्या स्वागत समारंभासाठी परिश्रम घेत आहेत.