नामनिर्देशनपत्र दाखल करण्याबाबत उमेदवारांना सूचना – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

यवतमाळ :- लोकसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र भरण्यास आज दिनांक 28 मार्च पासून प्रारंभ झाला. नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांनी घ्यावयाच्या काळजीबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. उमेदवारांनी त्या सूचनांप्रमाणे अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे भरण्याकरिता फॉर्म २ ए (कोरे) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तसेच भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नामनिर्देशपत्रे अधिसुचित केल्यानुसार दि.28 मार्च ते दि.4 एप्रिल पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ च्या दरम्यान सार्वजनिक सुट्टीव्यतिरिक्त उमेदवाराद्वारे किंवा त्याच्या सुचकाद्वारे निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष सादर करणे आवश्यक आहे.

उमेदवाराला नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता https://suvidha.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तथापि ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन केलेल्या अर्जाची क्युआर कोड असलेली प्रिंट काढून त्यावर स्वतःची सही करुन तसा अर्ज स्वतः अथवा त्याच्या सुचकामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सादर करणे बंधनकारक राहील. लोकसभा निवडणुकीकरीता अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांकरीता २५ हजार आणि अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती उमेदवारांकरीता १२ हजार ५०० इतकी आहे.

नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने भारत निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे फॉर्म 26 मधील प्रतिज्ञापत्र परिपुर्ण भरुन संलग्न करणे आवश्यक. नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने ३ महिन्याच्या कालावधीतील २ सेंटीमीटर बाय २.५० सेंटीमीटर या आकाराचा पांढरी पृष्ठ भूमी असलेला आणि पूर्ण चेहरा दिसेल असा डोळे उघडे असलेला कृष्णधवल अथवा रंगीत छायाचित्र संलग्न करावे तसेच छायाचित्राच्या मागील बाजूस उमेदवाराचे नाव व स्वाक्षरी असावी.

नामनिर्देशनपत्रे दाखल करणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्षामार्फत उमेदवारी दाखल करीत असल्यास १ सूचक व इतर सर्वांसाठी १० सूचक आवश्यक असेल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार अथवा सुचक यांनी सर्व कागदपत्रांसह दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात हजर असणे बंधनकारक आहे. त्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात प्रवेश देय राहणार नाही.

उमेदवाराचे नाव देशातील कोणत्याही मतदारसंघात असावे तसेच सूचकाचे नाव १४- यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात असणे आवश्यक आहे. एक सूचक एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करु शकतो. उमेदवारांचे नाव यवतमाळ मतदारसंघात नसल्यास देशातील ज्या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघाची मतदार यादीची प्रमाणित प्रत देणे अनिवार्य आहे.

नामनिर्देशन पत्रासोबत नमुना-२६ मधील प्रतिज्ञालेख पब्लिक नोटरी, मॉजिस्ट्रेट फस्ट क्लास, कमिशनर ऑफ ओथ यांच्या समक्ष स्वाक्षरीत केलेला असला पाहीजे. प्रतिज्ञालेख नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय, राज्य अथवा इतर नोंदणीकृत पक्षातर्फे उमेदवार उभा असल्यास ए ॲण्ड बी फॉर्म नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यत दाखल करणे आवश्यक आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

08 एप्रिल रोजी होणारा कोकण विभागीय लोकशाही दिन रद्द

Fri Mar 29 , 2024
नवी मुंबई :- कोंकण विभाग लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून, त्याबाबतची आदर्श आचारसंहिता दि. 16 मार्च 2024 पासून लागू झाली आहे. त्यामुळे दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी होणारा कोकण विभागी स्तरावरील लोकशाही दिन बैठक रद्द करण्यात आला आहे. असे उप आयुक्त, (सामान्य प्रशासन), कोकणविभाग, नवीमुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com