आरोग्य महामेळाव्यात लायन्स क्लब चे योगदान

सावनेर – आयुष्यमान भारत आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे तालुकास्तरीय महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन केल्या गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि. प. उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे होत्या. तसेच उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, मनोहर कुंभारे, अरुणा शिंदे, प्रकाश पराते, डॉ. दीपक सेलोकर, डॉ. संदीप गुजर आणि सावनेर नागरितील डॉक्टर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. मेळाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी अनेक रुग्णांची तपासणी करून औषधंपचार केलेत. यात अनेक सामाजिक संघटनानी सहभाग नोंदवला. यामध्ये लायन्स क्लब सावनेर मधील डॉ. अमित बाहेती, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. परेश झोपे, डॉ. छत्रपती मानपुरे यांचे योगदान होते. विशेषकरून या मेळाव्यात क्लब उपक्रम प्रभारी आणि आस्था पाथोलॉजि लॅब चे डॉ. प्रवीण चव्हाण आणि त्यांच्या चमुने महत्वाचे योगदान दिले. त्यांच्याकडून दोनशे च्या वर रुग्णाची शुगर तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. सदर सामाजिक सहकार्यकारिता सर्व डॉक्टर मंडळीचे, क्लब चार्टर अध्यक्ष वत्सल बांगरे, अध्यक्ष ऍड. अभिषेक मुलमूळे, सचिव प्रा. विलास डोईफोडे, कोषध्यक्ष ऍड. मनोज खांगरे आणि सर्व सदस्यांनी कौतुक करून आभार मानले. लायन्स क्लब यापुढेही सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहील अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोलिसांनी दिले अकरा गोवंश जनावरांना जीवदान

Thu Apr 21 , 2022
संदीप कांबळे, कामठी दोन आरोपीस अटक ,तीन लाखाचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 21:- विनापरवाना अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारी गाडी नवीन कामठी पोलिसांनी रनाळा – भिलगाव मार्गावर पकडून अकरा गोवंश जनावरांना जीवदान देऊन तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवारी सकाळी आठ वाजता सुमारास केली . नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनास रजा शेख करीम वय 25 राहणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com